शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची निवड

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तळणी संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळणी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील मुलांचां वयोगट १७ मधून विभागातून प्रथम येऊन राज्यस्तरावर संभाजी नगर विभागाच्या वतीने सदरील विद्यालय राज्याचे नेतृत्व करणार आहे. तसेच मुलींच्या वयोगट १७ मधून सुद्धा विभाग स्तरावर तृतीय क्रमांक मिळवून आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. 

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी मंडळ व प्राचार्य अशोक गरूड व उपप्राचार्य सतीश देशमुख, प्रशिक्षक आदी शिक्षकवृंद, कर्मचारी वृंद पालक यांनी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.